पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कंपनीत कामाला असताना वारंवार फोन करुन व WhatsApp वर संदेश पाठवून त्रास देत असल्याने एका तरुणीने कंपनीत जाणे बंद केले. तेव्हा कंपनीच्या मालकाने घरी येऊन सोसायटीमध्ये मोठ मोठ्याने आरडा ओरडा करुन अश्लिल शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १००/२२) दिली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यानुसार पोलिसांनी अनिकेत रवींद्र वर्टी Aniket Ravindra Varti (रा. मारवेल ऑरम, गल्ली नं. ७, कोरेगाव पार्क) याच्यावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ आगस्ट पासून सुरु होता. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आरोपी अनिकेत वर्टी याच्या कंपनीत कामाला होत्या.
तो फिर्यादी यांना विनाकारण वारंवार फोन करुन व्हॉटसअॅपवर संदेश पाठवून त्रास देत होता.
त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी २७ ऑगस्टपासून कंपनीत जाणे बंद केले होते.
त्यानंतर फिर्यादी या त्यांचे मित्र, मैत्रिणीसह घरी असताना अनिकेत वर्टी हा फोन करत होता.
त्यांनी फोन न घेतल्याने तो त्यांच्या घराबाहेर आला. त्याने दरवाजा वाजवला.
तेव्हा फिर्यादी तरुणीने तो आलेला पाहून दरवाजा उघडला नाही.
त्यानंतर त्याने मोठ मोठ्याने आरडाओरडा करुन फिर्यादी यांना अश्लिल शिवीगाळ केली.
तसेच अश्लिल व्हॉटसअॅप संदेश पाठवून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
त्यामुळे अनिकेत वर्टी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भुजबळ (PI Bhujbal) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Company owner visits female employee’s home and sexually abuses her; An incident in a posh society in Koregaon Park
हे देखील वाचा :
Pune Crime | व्यापार्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक