BJP MLA Ashish Shelar | ‘कौआ हंस की चाल नहीं चल सकता’, अमित शहांना आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं; आशिष शेलारांचा टोला (व्हिडीओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजप आमदार आशिष शेलार ( BJP MLA Ashish Shelar) यांनी आज रंगशारदा (Rang Sharada) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आव्हान कुणी कुणाला द्यायचे याबद्दल आरसा आणि आत्मचिंतन करण्याची उद्धव ठाकरे यांना गरज आहे. स्वत:च्या ताकदीवर तुम्ही कधी सरकार आणले का? 100 आमदार तुम्ही आणलेत का कधी निवडून? ज्या अमित शाह (Amit Shah) यांनी 100 च्यावर आमदार आणले, त्यांना तुम्ही आव्हान देणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, असे सांगत कौआ हंस की चाल नही चल सकता, असा टोला आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी उद्धव ठकारेंना लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आदित्य यांनी टक्केवारी घेतली हे सांगावं
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या तळेगाव येथील आंदोलनावर आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. आदित्य यांनी आधी किती टक्केवारी घेतली हे सांगावं, त्यांच्यामुळे वेदांत प्रकल्प (Vedanta Project) बाहेर गेला आहे, असा टोला शेलार यांनी लगावला. कुठलीही लढाई जिंकण्याआधी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा (Resignation) द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, असेही शेलार म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेची भूमिका लोकांना भ्रमित करणारी असून मराठी-गुजरातीचा वाद आणि द्वेष निर्माण करत आहेत, असे शेलार म्हणाले.
तीच खरी शिवसेना
उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park Ground) मिळालं, यावर विचारलं असता शेलार म्हणाले, या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही. प्रकरण शिंदे गट आणि पेंग्विन सेना मध्ये आहे. त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. ज्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार तीच खरी शिवसेना आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://www.facebook.com/watch/live/?ref=watch_permalink&v=1806865336347782
घोषणा देणाऱ्यांना ठेचून काढले पाहिजे
पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता.
यावर बोलताना शेलार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. घोषणा देणाऱ्यांना ठेचून काढले पाहिजे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांची देखील तीच भूमिका असेल. PFI वर जी कारवाई केंद्रीय यंत्रणांनी केली,
ती योग्यच आहे. ज्यापद्धतीने या देशात देशविघातक वातावरण निर्माण करण्याचे जाळे विणले जाते,
त्याविरोधात हा लढा असल्याचे शेलार यांनी सांगितले.
ठाकरेंना एकपात्री प्रयोग केला
शेलार पुढे म्हणाले, काल परवा हजार-दोन हजार लोकांसमोर एनएसईमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकपात्री प्रयोग केला.
त्या सभेत PFI किंवा तत्सम दहशतवादी इस्लामी संघटनांवर बोलण्याचे त्यांनी का टाळले? याचे उत्तर ते देतील का? असा सवालही त्यांनी केला.
Web Title :- BJP MLA Ashish Shelar | bjp mumbai chief ashish shelar slams shivsena chief uddhav thackeray
हे देखील वाचा :
Ashish Shelar | खडसे-अमित शाह यांच्या भेटीवर आशिष शेलारांचे मोठे विधान, म्हणाले… (व्हिडिओ)
Comments are closed.