पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | ताडपत्री (Tarpaulin) खरेदीसाठी येणार्या ग्राहकावरुन पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याने तरुणावर पालघन व तलवारीने वार (Sword Strike) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत द्रोण सुनिल मोरे Drona Sunil More (वय २३, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२५/२२) दिली आहे. त्यावरुन तौफिक अस्लम शेख Taufiq Aslam Shaikh (वय १९, रा. मिठानगर, कोंढवा) आणि महेबुब जावेद शेख Mahebub Javed Shaikh (वय १९, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) यांना अटक केली आहे. तर, शाहीद शेख Shaheed Sheikh (रा. नवीन म्हाडा कॉलनी, हडपसर) व त्यांचा साथीदार यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील गणपती मंदिरासमोर शनिवारी रात्री नऊ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी द्रोण व त्याचा आतेभाऊ सुमित वाघमारे (Sumit Waghmare) हे ताडपत्री विक्रीचा व्यवसाय (Tarpaulin Sales Business) करतात.
८ महिन्यांपूर्वी ताडपत्री खरेदी करता येणार्या ग्राहकांवरुन तौफिक व सुमित यांच्यात भांडणे झाले होते.
त्याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ सुमित हे गणपती मंदिरासमोर आले असताना त्यांना गाठले.
तेव्हा फिर्यादीचा भाऊ पळून गेला. आरोपींनी द्रोण याच्या डोक्यात, कमरेवर पालघन व तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले.
पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अभंग (Assistant Police Inspector Abhang) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Clashes between tarpaulin traders from customers The gang tried to kill themselves by stabbing them with swords Faraskhana police arrested two
हे देखील वाचा :
Pune Crime | लिफ्टमध्येच घेतला कुत्र्याने चावा; मालकिणीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल