पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | ३० वर्षाहून अधिक काळ नोकर म्हणून काम करणार्यावर विश्वासाने व्यावसायिक गाळ्यांचे भाडे वसुल करण्याचे काम दिले असताना त्याने दुसर्या कामगाराशी संगनमत करुन तब्बल १ कोटी २० लाख २८ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी शरद दिगंबर काळभोर Sharad Digamber Kalbhor (वय ५७, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५८/२२) दिली आहे. त्यानुसार संतोष यशवंत मयेकर Santosh Yashwant Mayekar आणि साईल संतोष मयेकर Sail Santosh Sayekar (दोघे रा. ताम्हाणेवस्ती, तळवडे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०२१ दरम्यान सहयोगनगर येथे घडला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मयेकर हा फिर्यादी काळभोर यांच्याकडे १९९० पासून नोकर म्हणून कामाला होता. काळभोर भोंडवे याचे मालकीचे तळवडे येथील गट नंबर १६५ मधील नंदादीप इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये एकूण ३९ व्यावसायिक गाळे आहेत. फिर्यादी यांनी या व्यावसायिक गाळ्यांचे भाडे वसुलीचे काम संतोष मयेकर याला दिले होते. त्याने फिर्यादी यांच्यावतीने भाडेकरु यांच्याकडून रोख तसेच चेक स्वरुपात भाडे वसुल केले. भाडे त्याने फिर्यादी यांना न देता या रक्कमेचा अपहार करुन ही रक्कम परस्पर स्वत:चे व साईल मयेकर यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली. फिर्यादी यांचा विश्वासघात करुन आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांची १ कोटी २० लाख २८ हजार २५० रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मुळीक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Cheating Case Chikhali Police Station Crime news
हे देखील वाचा :
Rain In Maharashtra | पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 4 दिवस सतर्क रहा