पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाने घर जाळण्यासाठी आग लावली. त्यात घराच्या संरक्षण जाळीवर असलेले कपडे, पोत्यांचे बारदान्यांबरोबरच रिक्षा आणि मोटारसायकल जळून खाक (Pune Crime) झाली. हा प्रकार कोथरुडमधील (Kothrud) म्हातोबानगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी रवींद्र वसंत कडु (वय ३७, रा. म्हातोबानगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन सिद्धार्थ मराठे (रा. प्रतिकनगर, पौड रोड, कोथरुड) याच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
फिर्यादी कडु याच्या भावासोबत आरोपी मराठे याचे भांडण झाले होते. या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन त्याने पहाटेच्या वेळी कडु यांचे घर जाळण्यासाठी आग लावली. या आगीमुळे घराचे संरक्षण जाळीवर असलेले कपडे व पोत्यांचे बारदाने जळून खाकी झाली. त्याचवेळी तेथे लावलेली रिक्षा आणि मोटारसायकल जळून खाक होऊन ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Burning the house given for the cause of an old quarrel Burn clothes rickshaws motorcycles with sacks
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
AK 47 | जम्मू काश्मीरमधील बडगाम येथील चकमकीत एक दहशतवादी ठार
Android यूजर्सने व्हावे सावध, तुमच्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे हे अॅप