Pune Crime Branch News | घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक; 3 गुन्हे उघडकीस, 5 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Video)

Pune Crime Branch

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime Branch News | पुणे शहरात घरफोडी (House Burglary In Pune) करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीकडून 5 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. विकास सुनील घोडके (वय 28, सध्या रा. दयासागर सोसायटी, गणेश नगर वडगाव शेरी, पुणे मुळगाव – मिरी रोड, विद्यानगर, शेवगाव, जिल्हा – अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Pune Crime Branch News)

पुणे शहरामध्ये वाढत्या घरफोडीच्या अनुषंगाने युनिट दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार गजानन सोनुने व अमोर सरडे यांना आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीला अटक करुन चौकशी केली. चौकशी दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला. पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली कटावणी, चावीचा जुडगा जप्त केला. याशिवाय इतर गुन्ह्यातील 77.260 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 54 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन सिहंगड आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपी विकास घोडके हा रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोर असून त्यावर ठाणे, कल्याण, पिंपरी-चिंचवड, लातूर तसेच
पुणे शहर भागामध्ये 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने सोन्या- चांदीचे दागिने प्रतीक सुरेश दहिवाळकर (वय 22 वर्ष, धंदा – सोनार कारागिरी, रा. मारवाडी गल्ली, शेवगाव, जिल्हा अहमदनगर), रोहन उर्फ दुध्या चव्हाण (रा. आईना हॉटेल जवळ, नाना पेठ, पुणे) यांना विक्री केल्याचे सांगितल्याने त्यांना गुन्ह्यात भादवी कलम 411 प्रमाणे कलम वाढ करून ते मिळून न आल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार
(IPS Pravin Pawar), अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade),
पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहा.पो.आयुक्त गुन्हे सुनील तांबे (ACP Sunil Tambe)
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई (PI Nandkumar Bidwai), पोलीस उप-निरीक्षक नितीन कांबळे
(PSI Nitin Kamble), पोलीस अंमलदार अमोल सरडे, गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, उज्वल मोकाशी,
साधना ताम्हणे, शंकर नेवसे संजय जाधव, गणेश थोरात,निखिल जाधव, विनोद चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.