Pune Crime | ब्रेकअप झाल्यावर तिला धडा शिकवण्यासाठी युट्युबवरून चोरी करायला शिकला; 14 लाखांवर मारला डल्ला

Pune Crime News | Pune Bharti Vidyapeeth police arrested the person who threatened Vasant More's son and demanded an extortion of 30 lakhs

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेयसीलाच धडा शिकवण्यासाठी त्याने चक्क यूट्यूब वरून चोरी कशी करायची हे शिकत प्रेयसीच्या घरावरच डल्ला मारला. तब्बल, १४ लाख २० हजार  रुपयांचे २८.७ तोळे दागिने आणि परकीय चलन लंपास केले. या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  सुमित बापू परदेशी Sumit Bapu Pardeshi (रा. पद्मावती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) तक्रार दिली  आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित याचे फिर्यादी मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, काही कारणावरून त्यांचे ब्रेकअप झाले. यामुळे, दुखावल्या गेल्याने सुमितने प्रेयसीला धडा शिकवण्याचे ठरवले. यासाठी त्याने यूट्यूबच्या साह्याने चोरी कशी करायची याचे प्रशिक्षण घेतले. त्यानुसार त्याने चोरीचा प्लॅन केला. त्याने २ तारखेला रात्रीच्या सुमारास फिर्यादीच्या घरात शिरून पर्स मधील सात हजार रुपये रोख आणि कपाटातील १४ लाख २० हजार रुपयांचे २८.७ तोळे सोन्याचे दागिने आणि परकीय चलन  लंपास केले.

 

ही घटना कळल्यावर फिर्यादीने भारती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला.
त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात सुमित हा संशयास्पदरीत्या फिरतांना दिसला.
पोलिसांनी त्याला अटक केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याचे कबूल केले.
प्रेयसीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे त्याने ही चोरी केल्याचे कबुल केले.
पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस  करत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth Police Arrest Criminal

 

हे देखील वाचा :

Narayan Rane – Uddhav Thackeray | नारायण राणेंचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती’

Nashik Aurangabad Road Accident | दुर्दैवी ! लक्झरी बसची ट्रकला धडक, अपघातात 11 प्रवाशांचा होरळपून मृत्यु; 38 जण जखमी

Ramdas Kadam | धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गट काय करणार? रामदास कदम म्हणाले, ‘यांना माहिती नाही की…’