मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Narayan Rane – Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले होते की, सध्या भाजपाने एक ’इव्हेन्ट’ युग देशात आणले आहे. त्यात जन्मापासून मयतापर्यंत उत्सव किंवा इव्हेन्टच केले जातात. त्यातलाच एक भाजप पुरस्कृत ’इव्हेन्ट’ दसर्यानिमित्ताने बीकेसी मैदानावर झाला. तेच आणि तेच रडगाणे याशिवाय तिथे दुसरे काय होते? नारायण राणे (BJP Leader & Union Minister Narayan Rane) यांनीही अचंबित होऊन तोंडात बोटे घालावीत असे खोटे, दळभद्री आरोप आमच्यावर केले गेले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यावर राणे यांनी संतापून अतिशय गंभीर आरोप केले आहेत. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
(Narayan Rane – Uddhav Thackeray)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पत्रकार परिषदेत राणे म्हणाले, उद्धव ठाकरे हे लबाड लांगडे आहेत. कारण ते खूप खोटं बोलतात. उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं. शिवाय मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती. परंतु, आज मी जिवंत आहे, कोणीच मला मारू शकलं नाही. उद्धव ठाकरे यांना मी पुरून उरेन. (Narayan Rane – Uddhav Thackeray)
राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मर्यादा राखावी. उद्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असतील. आम्ही आमच्या नेत्यांना बोललेलं खपवून घेणार नाही.
दसरा मेळाव्यावरून बोलताना नारायण राणे म्हणाले, यावेळचा शिवाजी पार्कचा दसरा मेळावा म्हणजे तमाशा पद्धतीचा मेळावा होता. उद्धव ठाकरे बोलायला लागल्यानंतर लोक उठून गेले. शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला. कारण शिमग्याला शिव्या द्यायचं काम होतं तसचं चित्र पवित्र शिवतीर्थावर पाहिला मिळालं.
राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिव्या शाप देण्यासाठी मेळावा घेतला होता काय, असं चित्र होतं.
केवळ शिव्या देण्याचं काम त्यानीं केलं. बाळासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा मिळत होती.
त्यातून आमची जडणघडण झाली. त्यामुळेच इथपर्यंत पोहचलो.
आताचे विचार पाहिलं तर त्यांना दुसरं काही येतं की नाही माहिती नाही.
राणे पुढे म्हणाले की, मराठी माणसांसाठी यांनी काय केलं.
केलं असतं तर मेळाव्यातून शिव्या देण्यापेक्षा अडीच वर्षात केलेली कामे सांगितली असती.
आपण कोण आहोत याची ठाकरेंना जाणीव करून दिली पाहिजे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title: Narayan Rane – Uddhav Thackeray | Serious charge of Narayan Rane; Said – ‘Uddhav Thackeray had given betel nut to Chota Rajan and Chota Shakeel to kill me’
हे देखील वाचा :
IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुल्का यांना क्लिन चिट मिळणार?