पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | श्रीमंत बाजीराव पेशवे (shrimant bajirao peshwa) यांच्या ३२१ व्या जयंती निमित्त घाडा व वाजंत्रीसह मिरवणुक काढणार्या ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांसह पदाधिकार्यांवर विश्रामबाग पोलिसांनी (vishrambag police) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अध्यक्ष आनंद दवे, मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मयुरेश घाणेकर, विनोद जोशी, मदन सिन्नरकर व इतर २० ते २५ स्त्रीपुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त बुधवारी लाल महाल चौक ते शनिवारीवाडा दरम्यान वाजंत्री, घोडा यांच्यासह मिरवणुक काढण्यात आली होती. शनिवारवाडा येथील कार्यक्रमात महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शहरात मिरवणुक, पदयात्रा काढून ५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असताना कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची कोणतीही खबरदारी न घेता लोकांचे जीवीतास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Web Title :- pune crime bajirao peshwas procession without permission crime against 5 persons including the president of brahmin federation
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी येऊनही 9 हजारांनी ‘स्वस्त’, चांदी महागली; जाणून घ्या आजचे दर
Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढ; मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील गुन्हाही सीआयडीकडे?