पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका 38 वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना पुण्यातील ताडीवाला रोडवर (Tadiwala Road) घडली आहे. ही घटना (Pune Crime) रविवारी (दि.11) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास बालमित्र तरुण मंडळाच्या जवळ असलेल्या सार्वजनिक रोडवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक (Arrest) केली आहे.
आकाश श्रीमंत ओहोळ (वय 38, रा. ताडीवाला रोड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश यांच्या पत्नी रेश्मा ओहोळ (वय 26, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी रोहित शिवा आगळे (वय 19) याच्यावर आयपीसी 307, महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करून अटक केली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती आकाश आणि आरोपी रोहित यांच्यात दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.
या भांडणाचा राग मनात धरून आरोपी रोहित याने रविवारी दुपारी आकाश यांच्यावर कोयत्याने वार केले.
आरोपीने फिर्यादी यांच्या पतीच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, कानावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला.
पोलिसांनी आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Case Tadiwala Road Incident Bundgarden police station
हे देखील वाचा :
Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा