पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्व वैमनस्यातून गुडांने (Criminal) आपल्या साथीदारासह वस्तीत येऊन दहशत पसरवुन युवकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी निखील रवींद्र जाधव Nikhil Ravindra Jadhav (वय २०, रा. महात्मा फुलेनगर, वैदवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११६१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राकेश ठोकळ (Rakesh Thokal) (वय २६), रामा सकट Rama Sakat (वय ३०), अल्ली यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. राकेश ठोकळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Police Record Criminal) आहे. ही घटना महात्मा फुले नगर येथे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र मोहसीन मोमीन (Mohsin Momin) हे वरकटाई देवीचे मंदिराजवळ बसले असताना त्यांच्या वस्तीत राहणारे आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी याला तुला लय माज आला आहे काय असे बोलून शिवीगाळ केली. फिर्यादी व फिर्यादीचे मित्रावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्यांची भांडणे सोडविण्यास येणारे लोकांना धमकावुन त्यांच्या मनात दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक डांगे (Assistant Police Inspector Dange) तपास करीत आहेत.
Web Title: Pune Crime | An attempt by a goon to kill a youth by stabbing him with a coyote due to previous enmity
हे देखील वाचा :
Pune Crime | बांधकामाच्या खड्ड्यातील पाण्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु
Pune News | पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू; 5 ग्रामपंचायती बिनविरोध