पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची धडक दुचाकीला बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात (Pune Crime) पुणे-सोलापूर रोडवर गुरुवारी (दि.1) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रामटेकडी चौकात झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संजय सुदाम साळवे (वय 40, रा. रामटेकडी, हडपसर) असे मृत्यृ झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी एसटी बसचालक चाँद सुलतान नसरुद्दीन शेख (वय 31, रा. कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत दुचाकीस्वार प्रकाश अशोक घुसर (वय- 19, रा. रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय साळवे आणि प्रकाश घुसर हे गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या
सुमारास दुचाकीवरून जात होते. ते दोघे रामटेकडी चौकात आले असता, भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची दुचाकीला धडक बसली. यामध्ये साळवे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Accident On Pune Solapur Road One Dead
हे देखील वाचा :
Pune Health News | चिंताजनक ! पुण्यात आढळला ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वराचा रुग्ण