बहुजननामा ऑनलाईन टीम : INDW vs AUSW | BCCI ने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. 9 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही टी-20 मालिका 5 सामन्यांची असणार आहे. या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे असणार आहे, तर मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. (INDW vs AUSW)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेआधी भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय संघाची प्रमुख खेळाडू पूजा वस्त्राकरला दुखापत झाल्यामुळे ती या मालिकेला मुकणार आहे. तसेच स्नेह राणादेखील या मालिकेत खेळणार नाही. (INDW vs AUSW)
https://twitter.com/BCCIWomen/status/1598520428582297600
ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.
नेट गोलंदाज – मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ऑस्ट्रेलिया – भारत टी-20 मालिकेचे वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 9 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता
India विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 11 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 14 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता
India विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 17 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 20 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता
Web Title :- INDW vs AUSW | indw vs ausw the indian womens squad for the t20 series against australia has been announced with harmanpreet kaur as the captain and smriti mandhana as the vice captain
हे देखील वाचा :
Pune Crime | एसटीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी; पुणे-सोलापूर रोडवरील घटना