पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | खासगी शिकवणी (Private Tuition) घेत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध (Love Affairs) निर्माण झाले. तरुणीचे लग्न ठरल्याने तिने शिक्षकाशी संबंध न ठेवण्यास सांगितले. तेव्हा त्याने तिच्याबरोबरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन नियोजित पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) नितीश सुडके ऊर्फ हर्षवर्धन लक्ष्मण पाटील Nitish Sudke alias Harshvardhan Laxman Patil (वय २८, रा. हिंगणे) याला अटक केली आहे. (Pune Crime)
याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६२/२२) दिली आहे. हा प्रकार जून २०२२ पासून सुरु होता. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीश हा फिर्यादी यांचा खासगी गणिताचा शिक्षक आहे.
त्यांच्यात २०२० मध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
दरम्यान, फिर्यादी यांच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरविल्याने तिने नितीश याला संबंध न ठेवण्यास सांगितले.
तरीही तो तिला वारंवार भेटून फिर्यादीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत असे.
तसेच वारंवार फोन करुन ज्या मुलासोबत फिर्यादीचे लग्न जमले आहे, त्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
पोलीस उपनिरीक्षक लोहार तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A young woman was molested by threatening to kill her intended husband; The teacher was arrested by Sinhagad Road Police
हे देखील वाचा :
Pune News | पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांची वर्षातून 3 वेळा तपासणी