पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मध्यरात्रीच्या वेळी पान शॉपसमोरील गर्दीला घरी जाण्यास सांगितल्याच्या कारणावरुन गुंडाच्या टोळक्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर (Senior Police Inspector) दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Stone Pelting On Police Inspector In Pune) . याप्रकरणी पोलिसांनी दंगल माजविल्याचा १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पोलीस नाईक गोविंद भारत फड यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिग्वीजय ककाराम वाघमोरे (वय १९, रा. रामनगर, वारजे), व्यंकटेश प्रमोद पिलवणकर (वय १९), अमोल निलेश पवार यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार लाल्या खान, आप्पा लोंढे, खंड्या वाघमारे व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. दिग्वीजय वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीएस हाके
(Senior Police Inspector DS Hake) हे कोथरुड विभागात (Kothrud Area) गुरुवारी मध्यरात्री
रात्रगस्तीवर होते. मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास गणपती माथा (Ganpati Matha Kothrud) येथे
त्यांना रॉयल पान शॉपसमोर गर्दी दिसली. त्यामुळे त्यांनी आपली पोलीस व्हॅन थांबवून हे पान शॉप बंद
करायला लावले व लोकांना तेथून निघून जाण्यास सांगितले.
तेव्हा दिग्वीजय वाघमारे व त्याचे साथीदारांनी जमाव करुन पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकार्यांच्या दिशेने दगडफेक करुन गल्लीत पळून गेले. पोलिसांनी त्यांच्यातील तिघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | A gang of goons pelted stones on a senior police inspector on patrol in Pune warje malwadi police station ganpati matha kothrud
हे देखील वाचा :
Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा, म्हणाले ‘हा महामोर्चा निघणारच, कोणीही…’