पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | डेटिंगसाठी (Dating) मुलगी हवी आहे का असे विचारुन एका ७९ वर्षाच्या नागरिकाला फोटो पाठवून त्याच्याकडून तब्बल १७ लाख १० हजार रुपयांना एका महिलेने गंडा (Fraud Case) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पॉप्युलरनगर येथे राहणार्या एका ७९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलिसांकडे (Waraje Police) फिर्याद (गु. रजि. नं. ४३६/२२) दिली आहे. त्यावरुन श्रेया असे नाव सांगणार्या महिलेवर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेबर २०२१ पासून २९ जून २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पॉप्युलरनगर येथे राहतात. ते घरी असताना त्यांना एका
महिलेचा फोन आला. त्यात तिने तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का अशी विचारणा केली.
तेव्हा फिर्यादी यांनी तिला फोटो पाठविण्यास सांगितले. त्यावर फोटो पाठविण्यासाठी तिने फिर्यादी यांना वेळोवेळी
पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना धमकावून पोलीस तक्रार देण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून
एकूण १७ लाख १० हजार रुपये पाठविण्यास लावून फसवणूक (Cheating Case) केली.
शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक बागवे (Police Inspector Bagway) तपास करीत
आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | 79-year-old ‘hobby’ old man got 17 lakhs of passion for ‘dating’, know the case of Warje Malwadi
हे देखील वाचा :
Shivsena | “भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील असे गुन्हे असताना देखील…”; सामन्यातून शिवसेनेचा हल्ला
Pune Crime | 31 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपींना अंतरिम जामीन मंजूर
Udayanraje Bhosale | “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर…”; उदयनराजे भोसलेंचा सरकारला सल्ला