पुणे : बहुजननामा ऑनलाइन | Pune Crime | परदेशातून गिफ्ट पाठविले असून ते कस्टममध्ये अडकले आहे. लॉटरी लागली, असे सांगून त्याची रक्कम मिळविण्यासाठी वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी (Cyber) गेल्या काही वर्षात अनेकांना कोट्यवधींना गंडा (Pune Crime) घातला. असे असले तरी त्यांच्या या जाळ्यात अजूनही लोक अडकत आहे. २५ लाख रुपयांच्या लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी एकाने तब्बल ४६ लाख ३५ हजार २०० रुपये गमावले.
याप्रकरणी बिबवेवाडीमधील सुपर इंदिरानगर (Super Indiranagar, Bibvewadi) येथे राहणार्या एका ३४ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनिल यादव, राहुल शर्मा, विनोद गुप्ता, विक्रम सिंग, पंकजकुमार, नितीन चौहान व इतरांवर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा (Bibvewadi Police Station) दाखल केला आहे. हा प्रकार २२ मे ते २० ऑगस्ट २१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने झाला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांच्या व्हॉटसअॅपवर संपर्क साधून फिर्यादी यांना तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. ही लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागतील असे सांगून त्यांना वेगवेगळ्या बहाण्याने विविध बँकेच्या खात्यावर पाठविण्यास सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लॉटरीची रक्कम मिळविण्याच्या मोहापायी फिर्यादी (Pune Crime) सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत गेले व त्यांनी ते सांगतील, त्याप्रमाणे रक्कम भरत गेले. त्यांनी २५ लाख रुपयांच्या लॉटरीसाठी तब्बल ४६ लाख ३५ हजार २०० रुपये भरले तरीही त्यांना लॉटरीची रक्कम मिळाली नाही. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station, Pune) तक्रार दिली. प्राथमिक तपासानंतर आता हा गुन्हा बिबवेवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | 46 lakh lost for 25 lakh lottery! Cyber thieves rob young man, shocking incident in Pune Bibvewadi police station cyber police station pune
Gold-Silver Price Today | खुशखबर ! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर
CNG Price Pune | पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर पण सीएनजीच्या दरात किलो मागे 1.80 पैशांची वाढ