पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सोशल मिडीयावर (Social Media) झालेल्या मैत्रीनंतर महागडे गिफ्ट पाठवले आहे. मात्र ते विमानतळावर पकडण्यात आले असून त्यांना सोडविण्यासाठी एका महिलेकडून 3 कोटी 98 लाख ७५ हजार 500 रुपये उकळण्यात आले आहे. हे पैसे मिळण्यासाठी नायजेरीयन टोळीने 67 बँक खात्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेने सायबर पोलिसांत (Cyber Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार टोळीतील जँगो निकोलस Django Nicholas (वय 29), माँण्डे ओकेके mannde okke (वय 26, दोघेही रा. नवी दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात आणखी एक जणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होते.
त्यांना ट्रान्झिट रिमांडद्वारे पुण्यात हजर करण्यात आले आहे.
21 सप्टेंबर 2020 ते 21 एप्रिल 2021 दरम्यान हा प्रकार घडला.
आरोपींच्या घर झडती दरम्यान 21 मोबाईल, एक हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 सीम आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील रक्कम जप्त करायची असून जप्त करण्यात आले आहे.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यांची पडताळणी करायची असून तांत्रिक विश्लेषण करायचे असल्याने आरोपींना 10 दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी,
असा युक्तिवाद सरकारी वकील मैथिली काळवीट (Public Prosecutor Maithili Kalvit) यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सायबर पोलिस ठाण्याच्या (Cyber Police Station) पोलिस निरीक्षक संगीता माळी (Police Inspector Sangita Mali) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
Web Titel :- Pune Crime | 4 crore cheating of a woman in Pune using 67 bank accounts; Two arrested from Delhi 21 mobiles, hard disk 5 net dongles 3 pen drives 4 laptops and 8 Sim Cards seized
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !
Mumbai |DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’
Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये