पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीवर बलात्कार (Rape in Pune) करुन नंतर लग्नास नकार देणार्या पोलीस अंमलदाराविरुद्ध (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमिज मुल्ला Ramiz Mulla (वय ३०, रा. शिवाजीनगर पोलीस लाईन – Shivaji Nagar Police Line) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील (Kondhwa) एका ३० वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
हा प्रकार लवासा (Lavasa), लोणावळा (Lonavala), ब्रम्हा आंगण सोसायटी (Brahma Angan Society) येथे २०१७ पासून ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार रमिज मुल्ला हा सध्या कोंढवा पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे.
त्याने कोंढव्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर लग्नास नकार दिला. सर्व ठिकाणी फिर्यादीला ही माझी बायको, असे सांगून फिर्यादी यांची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गपाट (PSI Gapat) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | 30 year old girl raped in Lavasa Lonavla Crime against a Pune Police Man Ramiz Mulla in Kondhwa Police Station of Pune
#Pune Crime #Rape in Pune #Shivaji Nagar Police Line #Kondhwa #Kondhwa Police Station #Lavasa #Lonavala
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update