पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) विविध विभागांमध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम कोणत्या ‘नेत्याशी’ संबधित कंपनीला द्यायचे, यावरून महापालिकेतील (Pune Corporation) दोन पदाधिकार्यांमध्ये आज चांगलेच ‘द्वंद्व’ रंगले. यामुळे एरव्ही 12 वाजता सुरू होणारी स्थायी समितीची बैठक (PMC standing committee Meeting) तब्बल 3 तास उशिराने सुरू झाली. यामध्ये एका पदाधिकार्याला मुंबईच्या (Mumbai) नेत्याचे ‘लाड’ पुरविण्यात यश आल्याने पुण्याचा ‘पैलवान’ नेता मात्र गारद झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महापालिकेच्या विविध विभागांना सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी निविदा काढण्यात आली होती.
सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम ‘मुंबईतील’ एका नेत्याच्या संस्थेला पुरविण्यासाठी महापालिकेतील (Pune Corporation) एक पदाधिकारी पुर्वीपासून प्रयत्नशील होता.
या नेत्याने मध्यंतरी महापालिकेत भेटीगाठीही घेतल्या होत्या. यासोबतच शहरातील सर्व पार्किंग चालविण्याचा कोट्यवधी रुपयांची निविदाही याच नेत्याच्या कंपनीसाठी काढण्यात आल्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान, महापालिकेकडे यापुर्वी सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम करणारी ठेकेदार कंपनील याच पक्षाच्या जिल्ह्यातील एका ‘पैलवान’ नेत्याशी संबधित आहे.
ही कंपनी 1 टक्के अधिक दरानेच सुरक्षा रक्षक पुरवित होती.
या कंपनीलाच नवीन निविदा मिळावी, यासाठी एक पदाधिकारी प्रयत्नशील होता.
मात्र, प्रशासनाने ऐनवेळी त्या कंपनीला अपात्र ठरवून स्पर्धेतून बाजूला केले.
यावरून मागील काही दिवसांपासून दोन पदाधिकार्यांमध्ये शीतयुद्ध (Cold War) होते.
आज ऐनवेळी निविदा मंजुरी आल्यानंतर या दोन पदाधिकार्यांमध्ये चांगलीच जुंपली.
अखेर त्या कंपनीकडील सुरक्षा रक्षकांनाच (security guard) नेमण्यात येईल, यावर तोडगा झाला.
यामुळे दुपारी 12 वाजता सुरू होणारी स्थायी समितीची बैठक दुपारी सव्वातीन वाजता सुरू झाली.
विशेष असे की पुर्वी एक टक्के अधिक दराने काम करणार्या कंपनीपेक्षा ‘मुंबई’ च्या नेत्याच्या कंपनीचा दर हा 9.45 टक्के एवढा अधिकचा आहे.
या कंपनीने बारगेन केल्यानंतर तो दर 6.50 टक्के अधिक करण्यात आला. केवळ नेत्याचे ‘लाड’ पुरविण्यासाठी महापालिकेला किंबहुना पुणेकरांना 5.5 टक्के अर्थात साधारण 2 कोटी रुपये भुर्दंड देण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
Web Title : Pune Corporation | Success in pampering Mumbai leader Pune’s superman fail Conflict between two office bearers over tender to provide security guards
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक