मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra |राज्यात रुग्ण वाढीचा दर कमी (state Patient growth) झाला असून मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच हजारांच्या आत येऊ लागली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट (second wave) हळूहळू ओसरु लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यात आज 4,688 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) मिळाला आहे. तर 4,196 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 51 हजार 238 इतकी आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याच दरम्यान राज्यात 104 कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 64 हजार 876 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 62 लाख 72 हजार 800 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.03 टक्के इतके झाले आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.12 टक्के एवढे आहे. सध्या राज्यामध्ये 02 लाख 91 हजार 701 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत. तर 2 हजार 121 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टिव्ह #कोरोना रुग्णांची जिल्हा निहाय आकडेवारी, दिनांक ३१ ऑगस्ट २०२१.#coronaupdatesindia #IndiaFightsCorona #missionbeginagain #BreakTheChain#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी#मी_जबाबदार pic.twitter.com/Fpc5NhEflw
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) August 31, 2021
पुण्यातील (Pune) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 243 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 208 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 06 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02.
– 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 495586.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2265.
– एकूण मृत्यू – 8926.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 484395.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7840.
पिंपरी चिंचवडमधील (PCMC) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 168 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 159 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात कोरोनाबाधित 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या 24 तासात एकाचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 269587.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 1302.
– एकूण मृत्यू – 4398.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 264147.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4142.
Web Title : Coronavirus in Maharashtra | 4,196 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक