पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Corporation | ‘अॅमेनिटी स्पेस’ (amenity space) दीर्घ काळासाठी भाड्याने देण्याचे नियोजन करून महापालिकेने (Pune Corporation) ‘चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावे लागतील’ या केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: यापुर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांतील सर्वसामान्य नागरिकांच्या पुढील पिढ्यांना मैदानांवर खेळण्यासाठी, ज्येष्ठांना व महिलांना शतपावलीकरिता उद्यानांत फिरण्यासाठी, एवढेच काय तर प्राथमिक आरोग्य आणि शिक्षणासाठी अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वित्तीय तूट कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील १८५ ऍमेनिटी स्पेस (amenity space) ३० वर्षांसाठी एकरकमी भाडे घेउन भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर केला होता.
स्थायी समितीने यामध्ये विविध आरक्षण असलेल्या आणखी ८५ ऍमेनिटी स्पेसची भर घालत २७० ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा ठराव मंजूर केला आहे.
या जागांवर सार्वजनिक वापराचेच १९ पद्धतीचे प्रकल्प अपेक्षित आहे.
यातून महापालिकेला ३० वर्षांत १ हजार ७५३ कोटी रुपये उत्पन्न अर्थात सर्व जागा भाडेतत्वावर दिल्यास दरवर्षी ५६ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे.
तसेच या जागाही अतिक्रमणमुक्त राहाणार असून याठिकाणी खाजगी तत्वावर नागरी सुविधा निर्माण होणार असल्याचा दावा प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.
भाडेतत्वावर देण्यात येणार्या आरक्षित ऍमेनिटी स्पेस प्रामुख्याने आंबेगाव बुद्रुक, बालेवाडी, बाणेर, बावधन खुर्द. धायरी, हडपसर, कात्रज, खराडी, कोंढवा बुद्रुक, महंमदवाडी, वडगाव खुर्द व बुद्रुक, धानोरी, मुंढवा, वडगाव शेरी, वारजे या मागील २० वर्षांपुर्वी महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील आहेत.
हे विशेष. या जागांवर प्राथमिक शाळा, खेळाचे मैदान, उद्यान, पार्किंग, रुग्णालय, नाट्यगृह, ओटा मार्केट, बाधितांसाठी घरे, पोलिस चौकी अशा सुविधांसाठी आरक्षणे आहेत.
खाजगी तत्वावर ही आरक्षणे विकसित केल्यास नागरिकांना महापालिकेच्यावतीने मिळणार्या प्राथमिक आरोग्य, मैदाने आणि उद्यांनाचा वापर हा व्यावसायीक तत्वावर पैसे मोजून करावा लागणार आहे.
यामध्ये सर्वसामान्य नागरिक खर्या अर्थाने भरडला जाण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.
याठिकाणच्या नागरिकांना उद्याने आणि मैदानांमध्ये जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
आंबेगाव बुद्रुक, खराडी, कोंढवा बुद्रुक, कोथरूड, वडगाव खुर्द, धानोरी, वडगाव शेरी याठिकाणची
तब्बल खेळाची मैदाने , तसेच हडपसर, खराडी, धायरी आणि वारज्यातील पाच उद्यानांसाठी
आरक्षित शेकडो चौ.मी.च्या जागांचाही यामध्ये समावेश आहे.
मोक्याच्या जागांवर डोळा?
आयटी उद्योगांमुळे बालेवाडी, बाणेर, बावधन खुर्द आणि हडपसरयेथे मोठ्याप्रमाणावर
गृहप्रकल्प झाल्याने मोठ्या प्रमाणात ऍमेनिटी स्पेस ताब्यात आल्या आहेत.
येथील अधिकतम ऍमेनिटी स्पेसच्या जागांवर आरक्षणे नाहीत.
लोकसंखेच्या तुलनेत याठिकाणी उद्याने, मैदाने यांची वाणवा आहे.
येत्या काही काळात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ही बालेवाडी, बाणेरमार्गेच धावणार आहे.
स्मार्ट सिटीच्या एरिया डेव्हलपमेंटमध्ये याच भागाचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच पीपीपी तत्वावर या परिसरातील काही रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे.
नॅशनल गेमच्यावेळी जेएनआरयूएमच्या माध्यमातूनही रस्त्यांच्या विकास करण्यात आला आहे.
यानंतरही नुकतेच पालिका प्रशासनाने या भागातील काही रस्त्यांचा पीपीपी तत्वावर
विकास करण्यासाठी सल्लागार नेमण्याची निविदा काढली आहे.
त्यामुळेच बाणेर, बालेवाडी, बावधन खुर्द परिसरातील ऍमेनिटी स्पेसच्या जागा व्यावसायीक
वापरासाठी नाममात्र दरात ‘बगल बच्च्यांच्या’ घशात घालण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून मोठी शक्ती कार्यरत असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
बाणेर, बालेवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. भौगोलिक दृष्टया या भागातील जमिनीची भूजल क्षमताही कमी आहे.
त्यामुळे याठिकाणच्या जवळपास प्रत्येक सोसायटीचा पाण्याच्या टँकरसाठी लाखो रुपये खर्च होतो.
आता छोट्या, छोट्या सार्वजनिक सुविधांसाठीही भविष्यात खर्च करण्याची वेळ यानिमित्ताने येणार!
असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Web Title : Pune Corporation | Development of amenity space through private developers Citizens of 23 villages included earlier will have to incur huge expenses for parks grounds and even primary health care
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update