बहुजननामा ऑनलाइन टीम –कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1577 नवे पॉझटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 33 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 13 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात कोरोनामुळं आतापर्यंत 1950 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1427 कोरोनाचे रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 82170 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 65346 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 14874 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकूण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 804 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 488 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क परिधान करा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करा असं आवाहन केलं आहे.