पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत वेगाने घट होत आहे. रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा (New patients daily in the city) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये (Pune City) गेल्या 24 तासात 280 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 318 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 75 हजार 377 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 64 हजार 203 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8516 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5951 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 26 लाख 04 हजार 688 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 409 रुग्ण गंभीर आहेत. तर 611 रुग्ण ऑक्सिजनवर (oxygen) उपचार (Treatment) घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Department of Health) दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.30 रुग्ण
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 36 हजार 335 रुग्णांपैकी 10 लाख 8 हजार 368 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण Active patient 10 हजार 540 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.30 टक्के आहे.
कृपया हे देखील वाचा:
Bhaichand Hirachand Raisoni | भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळयातील 8 आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
Pune News | ट्रकचालकांना लुटणार्या तीन दरोडेखोरांना 10 वर्षे सक्तमजुरी