पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये (Pune City) नवीन रुग्णांची (New patient) संख्या वाढत आहे. तर कोरोनामुक्त (Recover) होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये (Pune city) 316 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 297 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. pune corona news | 316 new corona patients in Pune in last 24 hours
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात (Pune City) आजपर्यंत 4 लाख 79 हजार 732 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 68 हजार 337 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात (Pune) गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील (Out of Pune Municipal Corporation limits) 07 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात (Pune City) 8612 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 2783 ॲक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये (Pune City) सध्या 2783 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 297 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील (Pune City) विविध केंद्रावर 5734 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
पुणे जिल्ह्यात 10 हजार ॲक्टिव्ह रुग्ण
पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 54 हजार 982 रुग्णांपैकी 10 लाख 26 हजार 712 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) 10 हजार 402 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.32 टक्के आहे.
Web Title : pune corona news 316 new corona patients in pune in last 24 hours
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
MLA Rohit Pawar | राजकारण व समाजकारणासोबतच आ. रोहित पवार जपत आहेत अध्यात्मिक विचारांचा ठेवा