पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Corona | पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 287 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 228 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 81 हजार 834 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 70 हजार 097 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 214 नवीन रुग्ण, 250 जणांना डिस्चार्ज
शहरात 3085 अॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 6074 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 27 लाख 36 हजार 235 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 3085 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 227 रुग्ण गंभीर आहेत. तर 491 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title : pune corona 287 new corona patients in pune city in last 24 hours
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update