पुणे न्यूज (Pune News) :बहुजननामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची (Pune Corona) संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये (Pune city) 150 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
pune corona | 150 new corona patients in Pune city in last 24 hours
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 79 हजार 882 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 68 हजार 586 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8617 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 2679 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2679 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 290 रुग्ण गंभीर आहेत. तर 448 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4084 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 26 लाख 97 हजार 692 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title : Pune corona | 150 new corona patients in Pune city in last 24 hours
lohegaon forest park road |लोहगाव परिसरात झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अडवून चाकूने सपासप वार, प्रचंड खळबळ
Burglary in Pune | पुण्याच्या कात्रज परिसरात घरफोडी, साडे चार लाखाचा ऐवज लंपास
Pune Crime News Ramwadi Area | पुण्याच्या रामवाडी परिसरात वाहने अडवुन चालकांना मारहाण; दोघांना अटक