बहुजननामा ऑनलाइन टीम – पतांजलीची डीलरशीप देण्याच्या बहाण्याने एका महिलेला दीड लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड परिसरातील ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश शर्मा आणि पंकज नाव सांगणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यवसाय करायचा होता. त्यामुळे त्या युट्युबवर व्यवसायासंदर्भात माहिती शोधत होते. त्यावेळी त्यांना पतांजली आयुर्वेंद लि. ही वेबसाईट दिसली. त्यानी ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधला. त्यावेळी राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना पतांजलीच्या उत्पादनाची माहिती देऊन त्याची डीलरशीप मिळाल्यानंतर कसा फायदा होईल, हे सांगितले. त्यानंतर ही डीलरशीप सुरू करण्यासाठी अगोदर दीड लाख रुपये भरावे लागतील, असे सांगून त्यांना पैसे भरायला सांगितले. त्यानुसार फिर्यादीनी आरोपीने सांगितलेल्या खात्यावर दीड लाख रुपये भरले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारची डीलरशीप मिळाली नाही. त्यांनी आरोपींशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, संपर्क झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.