पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पोलीस आयुक्त शहरातली गुन्हेगारी मोडीत काढण्यास सर्व प्रयत्न करत आहेत. मात्र, गुन्हेगारी कमी होत नसून, कडक लॉकडाऊन म्हणून जाहीर असलेल्या विकेंड म्हणजेच रविवारी एका दिवसात वेगवेगळ्या भागात 4 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे घडले आहेत. यात टवाळखोर पोरांनी तीक्ष्ण हत्यारानी सपासप वार करत गुन्हेगारीची धगधग कायम ठेवली आहे.
पहिली घटना ही स्वारगेटच्या गुलटेकडी भागात घडली असून दोन सराईत गुन्हेगार व त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी राडा घालत तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. तोही मध्यरात्री. याप्रकरणी जखमी तरुणाचे वडील दिनेश खिलारे (वय 42) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चिक्या उर्फ इस्तिर्या कांबळे (वय 19) व सागर मावस (वय 20) याला अटक केली आहे. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदार यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ऋषिकेश खिलारे हा तरुण जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चिक्या व सागर हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. दरम्यान फिर्यादी यांचा मुलगा व त्याचे दोन मित्र घराजवळ शतपावली करत होते. यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी यांच्या मुलाला त्याच्या मित्राबाबत विचारत आम्ही त्याला मारणार आहोत, असे म्हणत वाद घातला. तसेच शिवीगाळ करत त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.
तर दुसरी घटना ही विश्रांतवाडी भागात रात्री 8 वाजता घडली आहे. दोन गटात वाद झाल्यानंतर या टोळक्यात तुंबळ हाणामारी झाली आहे. प्रथम चौघांनी दोन तरुणांना लाकडी दंडक्याने बेदम मारहाण करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आशिष परदेशी (वय 19), शुभम महामुलकर (वय 21), विष्णू मुदलीयार (वय 30), शशिकांत जवळगे (वय 30) यांना अटक केली आहे. याबाबत मुखतार मसली (वय 24) या तरुणाने तक्रार दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र हे रात्री 8 वाजता आदर्श इंदिरानगर येथे थांबले होते. यावेळी हे आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी भांडण सोडवण्यास मध्ये पडले असता त्यांनाही बेदम मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला आहे. तर प्रतिस्पर्धी टोळक्यातील तिघांनी साडे आठ वाजण्याच्या सुमारास विष्णू मुदलीयार यांना मारहाण करत केली. यावेळी फिर्यादी तरुण प्रशांत परदेशी हे भांडण सोडवण्यास गेले असताना त्यांनाही या तिघांनी मारहाण केली. तर जीवे मारू असे म्हणत खाली पाडून लाकडी दांडूक्याने बेदम मारहाण करत सिमेंटचा ब्लॉक कपाळावर घालत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यातील तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत प्रशांत परदेशी (वय 20) या तरुणाने तक्रार दिली आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.
तसेच, चंदननगर भागात घडला आहे. मास्क न घालता एक व्यक्ती कचरा टाकण्यास आल्याने एकाने त्याला मारहाण केली. त्यावेळी व्यक्तीने त्याला पोलिसांत तक्रार करा, असे सांगितले. याचा राग आरोपीना आला आणि त्यांनी फिर्यादी यांना वकील होता का याचे असे म्हणत वाद घातला. तसेच त्यांना मारहाण करत कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अक्षय सुशील बोरगे (वय 26), सुमित सुशील बोरगे (वय 30) व वामन कोयजी झेंडे (वय 26) यांना अटक केली आहे. याबाबत संजय वसंत भोसले (वय 51) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी व आरोपी हे वडगावशेरी येथील माळवाडी गार्डन भागात राहतात. यादरम्यान एक अनोळखी व्यक्ती कचरा टाकण्यास आली. त्यावेळी त्याने मास्क घातला नव्हता. त्यामुळे अक्षय याने मास्क का घातला नाही, असे म्हणत वाद घालून त्याला मारहाण केली. यावेळी फिर्यादी हे तेथे आले व त्यांनी या अनोळखी व्यक्तीला पोलिसांत जाऊन तक्रार द्या, असे सांगितले आहे. यामुळे अक्षयला राग आले. त्याने याचे वकील होता का असे म्हणत वाद घातला. तसेच शिवीगाळ केली. फिर्यादी व आणखी एक जण समजवण्यास जवळ गेले असता तिघांनी मारहाण केली. तसेच अक्षय याने कोयत्याने वार केले आहेत. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.