नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रिम कोर्टाने नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे, वेबसाईटवर प्रकाशित करा, असे महत्त्वाचे आदेश देशातील सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
आता सर्व राजकीय पक्षांना ही माहिती आपल्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही ही माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. राजकारणी गुन्हेगारीकरण घडत असल्याची आदेश देताना सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. देशातील राजकीय पक्षांनी आपल्या नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे, वेबसाइट्स, फेसबुक, ट्विटर वर अशा सर्व माध्यमांद्वारे प्रसिद्ध करून जनतेला माहिती द्यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाने राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर चिंता व्यक्त करताना देशातील सर्व राजकीय पक्षांना महत्त्वाचा असा प्रश्न केले आहे कि, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यासारखी राजकीय पक्षांची अशी कोणती मजबुरी आहे. असं सुप्रीम कोर्टाने प्रश्न केला आहे.