पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक भा.ल. ठाणगे यांच्या ‘गोदान सहजीवनासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (बुधवार) महाराष्ट्र साहित्य परीषदेचे कार्यवाहक उद्धव कानडे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.
मुस्लिम समाजातील एक तत्वचिंतक गोसेवक मुबारक शेख यांच्या संकल्पनेतून ‘गोदान सहजीवनासाठी’ हे पुस्तक लिहण्यात आले आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा आज सकाळी सदाशिव पेठेतील देवगिरी सोसायटी येथे पार पडला. यावेळी कोरोना नियमांचे पालन करुन पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला सर्जन डॉ. पांडुरंग बुरटे, तुकाराम देवराम भालसिंग, सामाजिक कार्यकर्ते संदीप कोतकर, शांतीलाल लुनावत, ह.भ.प. साखरचंद महाराज, हरिश्चंद्र तोडकर, नरेंद्र पवार, अपना वतनचे सिद्दिक शेख आदी उपस्थित होते. तर संयोजन लक्ष्मण प्रकाशनचे भा.ल. ठाणगे, चैत्राली ठाणे यांनी केले होते.