बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या कालखंडातही सायबर चोरट्यांचा हैदोस नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. सायबर चोरट्याने चक्क एका प्राध्यापकांस तुमची केवायसी संपलेली आहे असे सांगून बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून ऑनलाइन 46 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी डहाणू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्याने प्राध्यापकाचा मोबाइल हॅक करून पेटीएम, फोन पे, फँक्स मार्ट, फ्रिरिचार्ज पेमेन्टमधील पैसे वर्ग करून फसवणूक केली आहे. डहाणू पारनाका येथे राहणार्या तक्रारदार प्राध्यापकांस सायबर चोरट्याने फोन करून के वायसी काढण्यासाठी वेबसाईट सांगितली. त्यानतंर त्यांचा मोबाइल हॅक करून पेटीएम, फोन पे, फँक्स मार्ट, फ्रिरिचार्ज पेमेंन्टच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने 46 हजार रुपयांना गंडविले आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात अशा ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडत असून बँक संबंधित माहिती कोणालाही देऊ नका. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.