बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियंका आपल्या काही फोटो आणि व्हिडीओमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. अनेकदा ती विविध मुद्द्यावर खुलून बोलताना दिसत असते. कधी कधी इंटरेस्टीग किस्सेही शेअर करत असते. पुन्हा एकदा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. हा किस्सा कान्स फिल्म फेस्टीव्हलमधील आहे. जेव्हा ती रेड कार्पेटवर उतरली होती तेव्हा त्याच्या काही मिनिटांपूर्वीच तिच्या ड्रेसची चैन निघाली होती. असं असूनही तिनं रेड कार्पेटवर उतरण्याचं धाडस केलं. यात तिच्या टीमनं तिची खूप साथ दिली.
प्रियंकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या कान्स फिल्म फेस्टीव्हलचे आहेत. यात ती स्टायलिश ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यात रेडी कार्पेटवर चालताना ती खूप कॉन्फिडंट वाटत आहे. तिच्या ड्रेसमध्ये काही गडबड होती याचा अंदाजही तिच्या चेहऱ्यावरून येत नाही. प्रियंकानं ड्रेसचा किस्साही या सोबत शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CKltYUHDEgG/
आपल्या पोस्टमध्ये ती लिहिते की, मी बाहेरून शांत दिसत आहे, परंतु क्वचितच कुणाला माहित असेल की, मी आतून खूप वैतागलेली आणि चिंतीत होते. या विंटेज ड्रेसची चैन तुटली होती. जेव्हा हा ड्रेस घातला जात होता तेव्हा. मी रेड कार्पेटवर उतरण्यासाठी काही मिनिटेच बाकी होती. माझ्या अनोख्या टीमनं माझा ड्रेस 5 मिनिटांच्या रस्त्यात कानमध्ये शिवला.
या सोबतच प्रियंका आपल्या पोस्टमध्ये पुढं लिहिते की, अशाच काही बिहाइंड द सीन कहाण्यांबद्दल जाणून घ्या मेट गाला मिस वर्ल्ड आणि इतर माझ्या आठवणी अनफिनिश्ड मध्ये.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होता. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 आणि टेक्स्ट फॉर यु या सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.