बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियंका आपल्या काही फोटो आणि व्हिडीओमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. आपल्या फोटोमुळं ती पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे.
प्रियंकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लुक पाहायला मिळत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बिकिनी घातली आहे. याची खास बात अशी आहे की, यात तिनं टिकली लावली आहे. प्रियंकाचा हे फोटो तेव्हाचे आहेत जेव्हा ती 19 वर्षांची होती. तिनं कॅप्शनमधून याबाबत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
प्रियंकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हे फोटो शेअरही केले आहेत.
View this post on Instagram
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होता. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 आणि टेक्स्ट फॉर यु या सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram