बहुजननामा ऑनलाईन – ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. प्रियाचे अनेक लूक चाहत्यांना नेहमीच आवडत असतात. सध्या प्रियाने (Priya Marathe) Instagram वर तिचे काही फोटोज शेअर केले आहेत जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रिया मराठे आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आता प्रियाच्या या एथनिक लूकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. प्रियाने शेअर केलेल्या या लुक मध्ये ती ट्रेडिशनल लुक मध्ये दिसत आहे. या लूकमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे.
प्रिया मराठे (Priya Marathe) केवळ एक अभिनेत्रीच नाही तर उद्योजिका देखील आहे.
तिने नुकताच स्वतःचा एक कॅफे देखील सुरू केला आहे.
अभिनयासोबतच ती हा व्यवसाय देखील उत्तमरीत्या पार पाडते.
प्रिया ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ या मराठी, तर ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘पवित्र रिश्ता’,
‘कॉमेडी सर्कस’ या मालिकेंमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
आता प्रियाचे हे फोटोज सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
तर प्रियाने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या
अभिनेते शंतनू मोघे याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Priya Marathe | priya marathe shared new look in blue saree see her photos here
हे देखील वाचा :
Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान