बहुजननामा ऑनलाइन टीम – इस्त्रायलच्या हल्ल्यात इस्लामिक जिहाद कमांडर मारला गेल्यानंतर या देशात अनेक मिसाइल हल्ले होत असतात. या घटनेवरुन केवळ इस्त्रायलच्या जनतेत भितीचे वातावरण नसून इस्रायल देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही भितीपोटी पळ काढल्याचे म्हटले जात आहे. नेतन्याहू सभेच्या दुसऱ्या दिवशी पक्षाच्या प्रायमरीसाठी प्रचार करत होते. त्यांनी सभा अर्धवट सोडून मध्येच सभेच्या ठिकाणाहून पळ काढल्याची घटना घडली आहे. सभा सुरू असताना पंतप्रधान नेतन्याहू यांना रॉकेटचा आवाज आल्याने ते तेथून निघून सुरक्षित स्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे.
इस्त्रायलमध्ये ही दुसरी घडना आहे. गाजा येथे इस्लामिक कमांडर ठार झाल्यानंतर 200 क्षेपणात्रे डागण्यात आली होती. यामध्ये अनेक नागरिक मारले गेले होते. गाजापट्टीकडून इस्त्रायलच्या दिशेने डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे आयरन डोम संरक्षण प्रमाणालीने रोखण्यात आल्याची माहिती इस्त्रायलच्या लष्कराने दिली. क्षेपणास्त्रे डागल्यानंतर पॅलेस्टाईन एन्क्लेव्हजवळ आणि दक्षिणेतील शहरअश्केलॉनमध्ये सारयन वाजू लागले. त्यावेळी नेतन्याहू सभेतच होते. असे लष्कराने सांगितले. इस्त्रायलच्या शासकीय प्रसारणकर्ता केएएन-11 ने काही फोटो प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये सुरक्षा रक्षक पंतप्रधान नेतन्याहू यांनी ‘रेड अॅलर्ट’बाबत माहिती देताना दिसत आहे.
याआधी 10 डिसेंबर रोजी लिकुड पक्षाच्या प्रमुखालाही दक्षिणी शहर असलेल्या अशदोदमधील एक सोडून जावे लागले होते. गाजा पट्टीत हल्ल्याचे अॅलर्ट देणारे सायरन वाजल्यामुळे लिकुड पक्षाच्या प्रमुखाने सभेची जागा सोडली होती. गेल्याच आठवड्यात इस्त्रायलच्या दिशेने दोन क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इस्त्रायलच्या लष्कराने दिली. प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलच्या दोन लढाऊ विमानाद्वारे जेथून क्षेपणास्त्र डागण्यात आली त्या जागेवर बॉम्ब हल्ला करण्यात आला.