पश्चिम बंगाल : बहुजननामा ऑनलाईन – पश्चिम बंगाल (West Bengal) मंत्रीमंडळातील मंत्री आणि तृणमूलचे काँग्रेसचे (TMC Leader) नेते अखिल गिरी (Akhil Giri) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. उपस्थितांशी बोलत असताना त्यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याबद्दल अतिशय निंदाजनक वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपा आमदार सुवेंदू अधिकारी (BJP Leader Suvendu Adhikari) यांच्यावर टीका करताना अखिल गिरी यांनी राष्ट्रपतींविषयी (President Draupadi Murmu) हे वादग्रस्त विधान केलं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
#WATCH | "We don't judge anyone by their appearance, we respect the office of the President (of India). But how does our President look?," says West Bengal Minister and TMC leader Akhil Giri in Nandigram (11.11.2022) pic.twitter.com/UcGKbGqc7p
— ANI (@ANI) November 12, 2022
अखिल गिरी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात वाद रंगला होता. त्यामुळे एका कार्यक्रमाच्या वेळी अखिल गिरी यांनी सुवेंदू अधिकारी यांना उद्देशूनही टीका करत होते. ते म्हणाले, “सुवेंदू अधिकारी म्हणतात, मी चांगला दिसत नाही. मग सुवेंदू अधिकारी तरी किती सुंदर दिसता? आपण कुणाचंही मूल्यमापन त्यांच्या दिसण्यावरून करत नाही. आपण देशाच्या राष्ट्रपतींचा नक्कीच सन्मान करतो. पण आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?” असा प्रश्न उपस्थित करून गिरी उपस्थितांकडे बघून हसू लागले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी तृणमूलच्या काँग्रेसच्या मंत्री जे वादग्रस्त विधान केले ते आता
व्हिडीओद्वारे आता सामाजिक माध्यमावर पसरत आहे. राष्ट्रपतींच्या पदाचा आदर, मान-सन्मान हा राखलाच
गेला पाहिजे, अशा भावना सगळीकडे व्यक्त होत आहेत. तर दुसरीकडे भाजपने या विधानाला आदिवासी विरोधी
म्हणाले आहे. शिवाय ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना सुद्धा या वादात खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला आहे.
Web Title :- President Draupadi Murmu | tmc minister akhil giri controversial statement president draupadi murmu look
हे देखील वाचा :
Deepak Kesarkar | …म्हणून दीपक केसरकर आणि नितेश राणे यांची युती
Pune Pimpri Crime | पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा, 3 जणांना अटक
Pune Pimpri Crime | फेसबुकवर जुळले प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार