बहुजननामा ऑनलाइन टीम – नागिन फेम अॅक्ट्रेस अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) लवकरच आई होणार आहे. अनिता सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव असते. गेल्या काही दिवसांपासून ती सोशलवर तिचे काही फोटो शेअर करत आहे. अशातच तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. अनिता फोटो शेअर करताना एक प्रश्न विचारला आहे. तिचा पती रोहित रेड्डी (Rohit Reddy) नं यावर कमेंट करत खास उत्तर दिलं आहे.
अनितानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये अनिता विचारलं की, काय वाटतं, मुलगा की मुलगी ? अनिताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे. पती रोहित रेड्डीनंही कमेंट करत उत्तर दिलं आहे. रोहित म्हणाला आहे की, जुडवा.
अनिता आणि रोहित यांनी 2013 साली लग्न केलं होतं. लग्नाच्या 7 वर्षांनंतर 39 व्या वर्षी ती आई होणार आहे. सध्या ती प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत आहे आणि खूप खुश आहे.
अनिताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिला मुलगा होईल म्हटलं आहे तर काहींनी मुलगी होईल म्हटलं आहे. अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
अनिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं ये है मोहब्बतें मध्ये आणि सुपरनॅचरल शो नागिनमध्ये काम केलं आहे. या मालिकेत तिनं नागिनची भूमिका साकारली होती.