बीड : बहुजननामा ऑनलाईन – गरोदरपणातील अनुभव आणि महिती देणारे एक पुस्तक (Pregnancy Bible) बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) हिने लिहिले असून हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. आपल्या पुस्तकाला करीनाने (kareena kapoor) प्रेग्नसी बायबल (Pregnancy Bible) असे नाव दिल्याने आता नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी करीनाविरूद्ध बीडमध्ये (Beed) अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने (Alpha Omega Christian Mahasangh beed) तक्रार दाखल केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
करीना कपूरने ’प्रेग्नसी बायबल’ (Pregnancy Bible) या आपल्या पुस्तकाच्या नावात बायबल शब्द वापरल्याने बीडमधील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने (Alpha Omega Christian Mahasangh beed) आक्षेप घेतला आहे. पुस्तकावर बायबल शब्द वापरल्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असून तो शब्द तात्काळ हटवावा, अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे.
बीडच्या (Beed) शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये (Shivajinagar Police Station) अल्फा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवर अद्याप करीना कपूर किंवा पुस्तकाच्या प्रकाशकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करावा,
अशी मागणी ख्रिश्चन महासंघाने केली आहे.
Web Titel :- Pregnancy Bible | beed police complaint filed against kareena kapoor in beed over book title
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र पूर्णपणे Unlock नाहीच