Prathamesh Abnave | प्रथमेश आबनावे यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Prathamesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस (Pimpri Chinchwad Youth Congress) प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून प्रभावी काम केल्याने आबनावे यांना अहमदनगर ग्रामीण व सोलापूर ग्रामीण प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या वर्षभरातील कामगिरी, तसेच नुकत्याच झालेल्या कसबा मतदारसंघातील निवडणुकीत विजय मिळण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पक्षाने त्यांना पिंपरी-चिंचवडचे प्रभारी म्हणून काम पाहण्याची संधी दिली आहे. (Prathamesh Abnave)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, राज्याचे प्रभारी मितेंद्र सिंग, सहप्रभारी प्रदीप सिंधव, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पक्षातील सहकाऱ्यांनी टाकलेला विश्वास व दिलेली संधी याबद्दल आभार मानतो. आगामी काळात पिंपरी-चिंचवडमध्ये युवक काँग्रेसचे काम प्रभावी होईल, अशी ग्वाही आबनावे यांनी दिली. (Prathamesh Abnave)
Web Title : Prathamesh Abnave | Prathamesh Abnave appointed as Pimpri Chinchwad Youth Congress in charge
हे देखील वाचा :
Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Comments are closed.