बहुजननामा ऑनलाईन – Prashant Damle | सध्या अभिनेते प्रशांत दामले हे त्यांच्या नाटकदौऱ्यावर आहेत. 12500 व्या प्रयोगानंतर ही त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकांचे प्रयोग सध्या प्रशांत दामले करत आहेत. प्रशांत दामले सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते नाटकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना नाटकाचे वेळापत्रक ही सांगत असतात. एवढेच नाही तर प्रशांत दामले बेधडक सामाजिक गोष्टींवर ही भाष्य करत असतात. नुकताच त्यांची अशाच पद्धतीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. (Prashant Damle)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संभाजीनगर येथील नाटकाचे दोन प्रयोग पूर्ण करून प्रशांत दामले परतिच्या प्रवासाला निघाले होते. नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वाटेत चांगल्या ठिकाणी स्वादिष्ट जेवण करून पुढे निघाले. यानंतर त्यांना आलेला अनुभव त्यांनी थेट व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितला. व्हिडिओ शेअर करत प्रशांत दामले म्हणाले, “संभाजीनगरचे दोन्ही प्रयोग अगदी खणखणीत झाले. रसिकांसाठी धन्यवाद….. अतिशय चविष्ट जेवण झाल्यानंतर औरंगाबाद वैजापूर रस्त्याने निघालो. रस्त्याची दुरावस्था तुम्ही पाहू शकता यामुळे जेवण आपोआपच पचेल. उद्या भेटूयात संध्याकाळी साडेपाच वाजता कालिदास नाट्यगृह नाशिक येथे”. (Prashant Damle)
प्रशांत दामले यांनी याआधी देखील कल्याण मधील रस्त्यांची अवस्था पाहून तीव्र शब्दात टीका केली होती.
“कल्याणमधील नाट्यरसिक उत्तम आहेत,पण कल्याणमधील रस्ते थर्डक्लास” अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.
आता पुन्हा एकदा प्रशांत दामले यांनी रस्त्यावरून टीका करून प्रशासनावर निशाणा साधला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Prashant Damle | prashant damle latest video shares aurangabad bad road condition
हे देखील वाचा :
Patan Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या तरूणावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
Nanded Crime | आदिवासी आश्रमशाळेतील 10 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; नांदेडमधील प्रकार
Gold Price | सोन्याच्या भावात घसरण