नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – Nanded Crime | जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेत 10 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनने एकच खळबळ उडाली आहे. (Nanded Crime)
विश्रांती देशमुखे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. विश्रांती हदगाव तालुक्यातील केदारगुढा येथील आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होती. सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास तिने वसतीगृहातील आपल्या दुमजली बेडच्या वरच्या लोखंडी रॉडला ओढणी बांधून गळफास घेतला. विश्रांतीच्या दोन बहिणी देखील याच आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. त्या दोघी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यावर शाळेतून आश्रमाच्या खोलीत आल्या असताना खोलीचा दरवाजा बंद होता. आवाज देऊनही विश्रांती दार उघडत नव्हती. त्यामुळे व्यवस्थापकाने दरवाजा तोडला तेव्हा विश्रांतीने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यामुळे दोन्ही बहिणींचा धीर खचला. आत्महत्याचे कारण अद्याप कळाले नाही. तसेच विश्रांतीने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठीही लिहिली नाही. (Nanded Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी आश्रमशाळेमध्ये गर्दी केली होती.
दरम्यान, या मुलीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी
आणि पालकांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Web Title :- Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | वीजखंडित करण्याच्या बहाण्याने दीड लाखांचा गंडा, पिंपरी मधील घटना
Gold Price | सोन्याच्या भावात घसरण
Gulabrao Patil On Eknath Khadse | ‘एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या’ – गुलाबराव पाटील