बहुजननामा ऑनलाइन टीम – विदर्भातील दुर्गम व नक्षल प्रभावित गडचिरोली विभागात १४२ नवीन पोस्ट(Post) ऑफिस सुरु करण्यात आली असून एकूण पोस्ट ऑफिसची संख्या ३६०० वर पोहचली आहे. तद्वतच कोरोनाच्या वाढत्या प्रसारादरम्यान सप्टेंबर महिन्यापर्यंत पोस्ट(Post) ऑफिस विभागाने विदर्भ भागात नवीन १ लाख खाते उघडले आहेत. त्यामुळे एकूण खात्यांची संख्या ३६ लाखांवर पोहचली आहेत.
विदर्भ विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाय यांनी सांगितले की, विभागाने दुर्गम भागातील नागरिकांना पैसे काढणे व जमा करण्यासाठी विविध योजनांशी जोडण्यासाठी अगोदरपासून पाऊले उचलले. परिणामी २ टक्के म्हणजेच तब्बल १ लाख नवीन खाते उघडण्यात आली. भविष्यात पोस्टात नागरिक पीपीएफमी, सिनियर सीटजन आणि मासिक आय योजनांचे खाते उघडतील. पोस्टाच्या माध्यमातून टर्म इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे ते म्हणाले. गतवर्षी नागपूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ५४,९०४ पासपोर्ट अर्ज प्रक्रियेत घेण्यात आले.
एप्रिल ते ३० सप्टेंबर झालेले कार्य
>> ३,७२,९९७ आधार लिंक्ड पेमेंट सर्विसच्या माध्यमातून १२१ कोटी ६४ लाख रुपयांचा व्यवहार
>> नागपूर विभागात आजवर आयपीपीबी अंतरंगात ७.५० लाख बॅँक खाती उघडण्यात आली.
>> सुकन्या योजनेअंतर्गत नागपूर विभागात २७ गावांना जोडण्यात आले.
>> २१६ गावांना विमा ग्राममध्ये समाविष्ट करण्यात आले.