नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या मुद्यावरून चीनला टक्कर देत ऑस्ट्रेलियाने देखील कोरोना वॅक्सीन तयार केलं आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, माणसांवर करण्यात आलेल्या या ट्रायल मध्ये कोणतेही साइड इफेक्ट्स दिसून आले नाहीत. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.5 कोटी इतकी आहे.
मागच्या महिन्यात क्विसलँड युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक कंपनीकडून ब्रिसलेनच्या 120 व्हॉलेंटीयर्सना वॅक्सीनचं ट्रायल करण्यात आलं होतं. प्रोजेक्ट मध्ये काम करणाऱ्या प्रोफेसर किथ चपैल यांनी सांगितलं की, युरोप मध्ये Viroclinics-DDL च्या वतीने जनांवरांवर वॅक्सीनचं ट्रायल करण्यात आलं होतं आणि ते सफल झालं.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन येथे माणसांवर करण्यात आलेल्या ट्रायल मध्ये कोणतेही साइड इफेक्ट्स दिसून आले नाहीत. आत्तापर्यंत संपूर्ण जगात माणसांवर 17 वॅक्सीनचं ट्रायल करण्यात आलं, त्यापैकी एक हे ऑस्ट्रेलियातील ट्रायल आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जगात 130 वॅक्सीनवर काम सूरू आहे. पण ऑस्ट्रेलियातील क्विसलँड युनिव्हर्सिटीने बनवलेली वॅक्सीन प्री क्लिनिकल डेवलपमेंट स्टेजमध्ये प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाने ब्रिटनची कंपनी एस्ट्राजेनेका सोबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये तयार होणाऱ्या वॅक्सीनसाठी करार केला होता. जर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची वॅक्सीन तयार झाली असती तर ती ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला मिळाली असती.