बहुजननामा ऑनलाइन टीम – दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रानं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. पंजाबी सिंगर आणि अभिनेत्यांनीही याला पाठींबा दिला आहे. हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे.
काय म्हणाली रिहाना ?
रिहानानं ट्विटरवर एक न्यूज शेअर करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला. यात शेतकरी आंदोलनामुळं बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात हरियाणातील अनेक जिल्ह्यात यामुळं इंटरनेट सेवा कशा प्रकारे बंद करण्यात आली हेही सांगितलं आहे. या न्यूजसोबत तिंन कॅप्शनमध्ये लिहिलं की, आपण यासंदर्भात चर्चा का नाही करत आहोत.
रिहानाचं हे ट्विट समोर आल्यानंतर आता रिहानाच्या फॉलोवर्सची जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरील फॉलोवर्सच्या तुलनेत रिहाना एक पाऊल पुढं असल्याचं दिसत आहे.
पीएम मोदींचे ट्विटरवर 63.5 मिलियन म्हणजेच 6 कोटी 35 लाख फॉलोवर्स आहेत. तर रिहानाचे तब्बल 1001 मिलियन्स म्हणजेच 11 कोटी फॉलोवर्स आहेत. याचा अर्थ असा आहे की, ट्विटरवर रिहाना पीएम मोदींपेक्षा जास्त लोकप्रिय आहे असं दिसतंय. रिहाना एकूण 1029 लोकांना फॉलो करते, तर मोदी 2351 जणांना ट्विटरवर फॉलो करतात.
— TimePass (@TimePassTalks) February 3, 2021
रिहाना 32 वर्षांची असून ती बारबडीयन गायिका आणि अॅक्ट्रेस व उद्योजकही आहे. 21 व्या शतकातील ती जगातील टॉपची गायिका आहे. आपल्या हॉटनेससाठी रिहाना सोशल मीडियावर खूपच फेमस आहे. तिनं अनेकदा तिच्या बिकिनी लुकनं राडा घातला आहे. रिहानाचे न्यूड फोटोही अनेकदा व्हायरल होताना दिसले आहेत.