• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pooja Chavan Suicide Case : संजय राठोड ‘या’ व्यक्तींच्या संपर्कात ? कार्यालयातील प्रशासकीय सुरळीत सुरु

by Balavant Suryawanshi
February 17, 2021
in ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड हे नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यामध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण हिच्या सोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून केला जात आहे. भाजपने ऑडिओ क्लिप देऊन यामधील आवाजाचा तपास करण्याची मागणी केली होती. आता या ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संजय राठोड यांचे नाव समोर आले. संजय राठोड हे पूजासोबत बोलत असतानाचे 10-12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने हे प्रकरण चांगलेच तापू लागले. राज्यातील विरोधी पक्षाने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव टाकला जात आहे. यामुळे संजय राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे.

संजय राठोड नॉट रिचेबल, मात्र कामकाज सुरळीत

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर संजय राठोड गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी देखील ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड हे नेमके आहेत तरी कुठे, असा सवाल उपस्थित केला जाता आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. परंतु आज मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरु आहे. त्यामुळे संजय राठोड हे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असावेत अशी शंका उपस्थित केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला राठोड याची गैरहजेरी

पूजा चव्हाण या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान या प्रकरणात राठोड यांचे नाव आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीमध्ये संजय राठोड गैरजहर होते. आज कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होणार असून या बैठकीला संजय राठोड उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राठोड प्रसारमाध्यमांसमोर येणार

या प्रकरणानंतर संजय राठोड कुठे आहेत हे समजू शकले नाहीत. मात्र, येत्या गुरुवारी (दि.18) ते प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी या गावात बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरुंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

बीड जिल्ह्यातील परळी या गावची असलेली पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत रहात होती. सोमवारी (दि.8) तिनं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. परंतु पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

Tags: Arun Rathoreaudio clipMinisterMinister Sanjay RathorePooja ChavanPooja Chavan suicide caseSanjay Rathoresocial mediaSuicide Caseअरुण राठोडऑडिओ क्लिपपूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणमंत्री संजय राठोडसंजय राठोडसोशल मीडिया
Previous Post

कोविड रुग्णांना धोकादायक बुरशीजन्य संसर्ग; बर्‍याच रुग्णांची दृष्टी कमी झाली

Next Post

अनंत गीतेंच्या वक्तव्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या, म्हणाले – ‘तुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक’

Next Post

अनंत गीतेंच्या वक्तव्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या, म्हणाले – ‘तुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक’

Please login to join discussion
nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

ममता बॅनर्जीचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘डोनाल्ड ट्रम्पपेक्षाही खराब नशीब तुमची वाट पाहतंय’

2 days ago

जाणून घ्या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप वाढविण्याची सोपी पध्दत, थर्ड पार्टी अ‍ॅपची नाही गरज

3 days ago

Breaking ! पिंपरी-चिंचवड : पोलिस कर्मचारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

4 days ago

Inside Story : सांगलीत नेमकं काय घडलं ? भाजपकडे बहुमत असूनही राष्ट्रवादीचा महापौर कसा निवडून आला ?

3 days ago

जळगाव : 2 मुलांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

1 day ago

Pune News : तऱ्हेवाईक प्रेमीयुगुलाची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat