बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई: ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचे प्रकरण शांत झाले तोपर्यंत आता अन्य एका मंत्र्यावर झालेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
बीड जिल्ह्यातील परळीत पूजा चव्हाण शिक्षणासाठी महिन्यापूर्वीच पुण्यात आली होती. पूजाचे आई- वडील परळीत राहतात. तिच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे. पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. साेशल मीडियावर तिचे लाखो चाहते होते. पुण्यात ती भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती.
मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आत्महत्या केलेल्या मुलीचा लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये काय आहे हे जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच असा इशाराही त्यांनी दिला.
ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल
पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका कथित मंत्र्याशी तिचा संबंध जोडला गेलेला आहे. त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना करीत असल्याचा संवाद आहे. कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घे हे प्रकरण वाढता कामा नये, अशा सूचना त्या संवादात आहेत.