अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – Police Inspector Suspended | अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपींना मदत करणे श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे (Shrirampur Police Station) पोलीस निरीक्षक संजय सानप (Police Inspector Sanjay Sanap) यांना चांगलेच महागात पडले आहे. आरोपींना मदत केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निलंबित (Police Inspector Suspended) करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. याच प्रकरणात दोन दिवसांपूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी (Police Naik Pankaj Gosavi) यांना निलंबित करण्यात आले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळवून नेवून (Abduction) धर्मांतर करुन निकाह करत अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मुल्ला कटर व त्याच्या टोळीचे कोणतेही गुन्हे उघडकीस येवू नये यासाठी मदत केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सानप दोषी आढळून आले आहेत. यानंतर अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची (Police Inspector Suspended) कारवाई केली.
श्रीरामपूर शहरातील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिचे धर्मांतर (Convert to Religion) करत तिच्यावर तीन वर्षे अत्याचार केले.
याप्रकरणी मुल्ला कटरसह (Mulla Cutter) आणखी तिघा जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन त्यांना अटक केली होती.
सध्या ते पोलीस कोठडीत असून त्याप्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) करत आहेत.
या प्रकरणाचा तपास करत असतानाच असेच आणखी काही गुन्हे उघडकीस येत असल्याचे पाहून मुल्ला कटर व त्याच्या टोळीला पोलीस निरीक्षक संजय सानप हे मदत करत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला होता.
परंतु त्याची दखल श्रीरामपूरात घेतली नाही.
म्हणून फिर्यादी महिलेने याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली.
त्यांनी याप्रकरणाची शहनिशा केली असता पोलीस निरीक्षक सानप हे दोषी आढळून आले.
त्यात त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – Police Inspector Suspended | ahmednagar shrirampur police station police inspector Sanjay Sanap suspended for helping accuse
हे देखील वाचा :