नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PNB Junior SF Account | पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) यावेळी तुमच्या मुलांसाठी एक विशेष सुविधा घेऊन आली आहे. या सुविधेमध्ये बँक मुलांसाठी विशेष खाते देणार आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. या खात्याचे नाव पीएनबी ज्यूनियर एसएफ अकाऊंट आहे. या सेव्हिंग खात्यात मुलांना लहानपणापासून बचतीची सवय होऊ शकते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे खाते उघडण्यासाठी फोटोसह आयडेंटिटी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफसुद्धा आवश्यक आहे. या खात्याची वैशिष्ट्य जाणून घेवूयात –
हे खाते अल्पवयीन मुलांसाठी आहे.
खाते मुलांचे कायदेशीर आणि नैसर्गिक आई-वडील उघडू शकतात.
याशिवाय 10 वर्षापेक्षा मोठी मुले हे स्वता उघडू शकतात आणि ऑपरेट करू शकतात.
यात मिनिमम बॅलन्स आवश्यक नाही.
इनिशियल डिपॉझिट झीरो आहे.
Minimum Quarterly Average Balance (QAB) झीरो आहे.
50 चेकचे चेकबुक मिळते.
या खात्यातून NEFT ट्रांजक्शन केले तर प्रति दिन 10 हजार रुपयांपर्यंत फ्री ट्रांजक्शन करू शकता.
शाळा आणि कॉलेजसाठी डिमांड ड्राफ्ट फ्री आहे.
Rupay एटीएम कार्डवर ग्राहकांना दररोज 5 हजार रुपये काढता येतात.
या लिंकद्वारे घ्या खात्याची माहिती
या खात्याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.pnbindia.in/pnb-junior-sf-account.html या लिंक वर व्हिजिट करू शकता. येथे खात्याशी संबंधीत सर्व माहिती मिळेल.
Web Title : pnb junior sf account punjab national bank give facility to junior saving fund account know about it
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update