पुणे : बहुजननामा ऑनलाइन – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) आर्थिक मागास प्रवर्ग आणि अल्पउत्पन्न गटासाठी पीएमआरडीएच्या (PMRDA) माध्यमातून मोशी आणि वाल्हेकरवाडी येथे बांधण्यात येणार्या ७९३ सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा आज शुभारंभ झाला. २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून पीएमआरडीएच्या वेबसाईटवर नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त बन्सी गवळी (Bansi Gawli) यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) मोशी (Moshi) येथे आर्थिक मागास प्रवर्गासाठी वन बीएचकेच्या ३१ सदनिका उपलब्ध असून सदनिकेची किंमत ७ लाख ४० हजार आहे. तर टू बीएचकेच्या ७९३ सदनिका असून एका सदनिकेची किंमत ३२ लाख रुपये आहे. वाल्हेकरवाडी येथे वन रुम किचनच्या ३६६ सदनिका असून एकीची किंमत १८ लाख ८० हजार रुपये तर वन बीएचकेच्या ४१४ सदनिका असून एकीची किंमत २५ लाख ४७ हजार रुपये आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.pmrda.gov.in अथवा http://lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन गवळी (PMRDA Bansi Gawli) यांनी केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – PMRDA invited online applications for 1604 flats under Pradhan Mantri Awas Yojana
हे देखील वाचा :
Pune Crime | पुण्यातील बिल्डरवर कुर्हाडीने हल्ला
Tata Steel | ट्विन टॉवर पाडणार्या कंपनीचे लक्ष आता टाटा स्टीलवर, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण…